कोरोना नियम व सूचनांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करणार:-पोलीस निरीक्षक संदीपजी घोरपडे.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार
राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील व ग्रामस्थ यांना कळविण्यात येते की , पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तरी सर्वांनी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावयाचे आहे .सर्वांनी मlस्क व सॅनिटायझर चा वापर करावा ,गर्दीची ठिकाणे टाळावी,लग्न समारंभामध्ये व इतर सर्व कार्यक्रमााध्ये फक्त 50 लोकांना परवानगी आहे.अंत्यविधी करता फक्त 20 लोकांना परवानगी आहे. लग्न समारंभाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.हॉटेल ,फार्महाऊस किराणामालाची दुकाने. व इतर दुकाने मंगल कार्यालय, चहाच्या टपऱ्या, येथे गर्दी आढळून आल्यास व त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येतील .घरमालक/ दुकान मालक यांनी भाडेकरू ची माहिती पोलीस स्टेशन ला देने बंधनकारक आहे.गावातील मंदीर, पुतळे, यांच्या सुरक्षेसाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविणे.
सर्वांनी वरील नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.वरील नियमांचे व सूचनांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल.अशी माहिती राजगड पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.

