करंदी खे.बा. येथे आणखी 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.
नसरापूर (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
रविवार (दि.21) मार्च 2021 रोजी करंदी खे. बा. (ता. भोर) येथील 2 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 5 झाली आहे. त्यामुळे करंदी खे. बा.गावातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वतोपरी पालन करून मास्क व सोशल डिस्टनस ठेवा ,गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयदीप कापसिकर यांनी न्यूज वार्ताशी बोलताना केले.
“गावातील एकूण पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. .
ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, सार्वजनिक कार्यक्रम , अनावश्यक बाहेर न फिरणे ,गर्दी न करणे ,वाढदिवस आदी गर्दीचे कार्यक्रम टाळा. प्रत्येकाने काळजी घ्यावी .

