करंदी खे.बा. येथे 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.
नसरापूर (प्रतिनिधी):-"पत्रकार पवार"
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
शुक्रवार (दि.19) मार्च 2021 रोजी करंदी खे. बा. (ता. भोर) येथील 3 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे करंदी खे. बा.गावातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वतोपरी पालन करून मास्क व सोशल डिस्टनस ठेवा ,गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन करंदी खे. बा. च्या सरपंच अलका तळेकर यांनी "न्यूज वार्ता"शी बोलताना केले.
या बाबत बोलताना करंदी खे. बा.गावचे ग्रामविकास अधिकारी परमेश्वर गोमसाळे म्हणाले, की “गावातील तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावांतील व बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तीने मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, सार्वजनिक कार्यक्रम , अनावश्यक बाहेर न फिरणे ,गर्दी न करणे ,वाढदिवस,लग्न समारंभ आदी गर्दीचे कार्यक्रम टाळा. प्रत्येकाने काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या कोरोना आपत्तीतून आपणास कोणीही वाचवू शकणार नाही”. असे मत नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक आरोग्य अधिकारी अनिल नाईक यांनी केले

