अखेर कै.गोपाल काळमेघ यांच्या पत्नीला मिळाले 11 लाख गृहकर्ज माफीच पत्र.

Maharashtra varta

 अखेर कै.गोपाल काळमेघ यांच्या पत्नीला मिळाले 11 लाख गृहकर्ज माफीच पत्र...




मुबंई (प्रतिनिधी):-

प्रहारचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव  यांनी मयत गोपाल काळमेघ यांच्या पत्नीला  11 लाख रुपयांचे गृहकर्ज माफीच पत्र मिळवून न्याय दिला.तब्बल दोन वर्ष चाललेला काळमेघ कुटुंबाचा संघर्ष  राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गौरव जाधव यांच्या सहकार्याने  या कुटूंबास न्याय मिळाला. 

सविस्तर माहिती अशी की,श्रीमती काळमेघ यांनी गौरव जाधव यांना फोनवर अशी माहिती दिली की, सुमारे दीड ते दोन वर्षापूर्वी एका छोट्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा डॉक्टरच्या चुकीमुळे माझ्या पतीचे निधन झाले . हॉस्पिटलने सवयीप्रमाणे हात वर केले .कुटुंबाच्या आयुष्यात क्षणात जन्मासाठी अश्रू उभे राहिले .गृहकर्जाची पॉलिसी असून देखील कर्ज कंपनीने देखील कर्ज माफ करण्यास नकार दिला. सर्व कागद पाठवून देखील तब्बल दोन वर्षे केवळ हेलपाटे मारायला सांगितले. नैसर्गिक मृत्यु पॉलिसी बसत असून देखील रिपोर्ट मधील नको, त्या  शब्दाचा आधार घेत श्रीमती काळमेघ या विधवा स्त्रीला 50 ते 60 वेळा फेऱ्या मारायला लावल्या.

  प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित कल्याण येथील प्रहार जिल्हाध्यक्ष एडवोकेट स्वप्नील पाटील यांना बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन न्याय देण्यास कळवले होते. पण केवळ ग्राहकांशी फसवणूकच करायची याच उद्देशाने कोणीच अंगावर न घेता केवळ इकडे तिकडे टोलवाटोलवी करत होते. शेवटी यांना धडा शिकवायचा या उद्देशाने अंधेरी येथील बँकेच्या कार्यालयात गेलो. सुरुवात सिक्युरिटी गार्ड पासूनच झाली . बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कान उभे राहतील अशा शब्दात गौरव जाधव व ,स्वप्नील पाटील त्यांचे  मित्र  ॲड.विवेक ठाकरे यांनी त्यांची देखील संबंधित अधिकाऱ्याची कान उघाडणी केली.

           तिथून लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन थेट मंत्रालय शेजारी असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यालयात सर्वजण लाथ मारेन तिथे पाणी काढीन याच उद्देशाने उभे राहिले.  तब्बल तीन तास नाही हो,नाही हो, करणारा विमा पॉलिसीचा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांला शेवटी प्रहार काय करू शकते , हे दाखवलेच ! शेवटचे शस्त्र उपसले, तेव्हा बँक अधिकाऱ्याने सपशेल लोटांगण घातले.

             यावेळेस गौरव जाधव म्हणाले की, आमच्या एका भगीनीच्या डोळ्यातील व आयुष्यातील थोडं दुःख कमी करण्याची संधी व मार्गदर्शन  राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यामुळे आज आम्हाला लाभले.

To Top