कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडू नका:- भोर प्रहार पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांची मागणी.
भोर (प्रतिनिधी)
भोर तालुक्यातील विद्युत विभागाची योजना चांगल्या प्रकारे आहे. विद्युत विभागाचे कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याचे चालू असलेल्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांचा रोष शासनावर होत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना कनेक्शन न तोडता चालू बिले भरण्यासाठी दिनांक 1 जून 2021 ची तारीख निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भोर व नसरापूर तसेच तहसील व प्रांत भोर यांना दिले आहे.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की, भोर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी महिन्याचे विद्युत दिन एचपी पंप अनुसार आकारले जाते .शेतकरी वर्षातून एक ते दोन हंगामाच्या वेळी विद्युत वाहिनी चा वापर करतात. विद्युत विभागाने सध्या दिलेले वीजबिल हे चुकीचे असल्याने सदरचे बिले रद्द करून त्याचा पुनर्विचार करावा अशी विनंती निवेदनाद्वारे प्रशासन यांच्याकडे केली आहे.
यावेळेस भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिव सचिन गावडे,बापू कुडले, राम पाचकाळे आदी उपस्थित होते.

