राजगड हद्दीत नऊ हॉटेल मालकांवर गुन्हे व विनामास्क फिरणारे 100 लोकांना दंड

Maharashtra varta

 राजगड हद्दीत नऊ हॉटेल मालकांवर गुन्हे व  विनामास्क फिरणारे 100 लोकांना दंड



पुणे (प्रतिनिधी):-

 जिल्हाधिकारी पुणे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी पुणे अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असताना कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आलेल्या असताना राजगड पोलिस स्टेशन हद्दीत 18 मार्च 19 मार्च रोजी पुणे सातारा हायवे रोड लगत असणारे 9 हॉटेल मालक चालक यांच्या विरुद्ध भादवि कलम 188 269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून तसेच सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणारे असे एकूण शंभर लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आल्याची माहिती राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी  बोलताना सांगितले.


 या वेळेस सदरची कारवाई  डॉ. अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक,  मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती माननीय धनंजय पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस बी घोरपडे,पोसई मगदूम, पोसई साबळे तसेच शिंदेवाडी पोलीस दूरक्षेत्र पोलीस , खेड शिवापूर पोलीस दूरक्षेत्र किकवी,नसरापूर पोलीस ट्राफिक  नसरापूर बीट अंमलदार यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

To Top