आदर्श शिक्षिका प्रतिभा पंखेवाले यांचे आकस्मिक निधन.

Maharashtra varta

 आदर्श शिक्षिका प्रतिभा पंखेवाले यांचे आकस्मिक  निधन.


भोर( प्रतिनिधी):- पत्रकार पवार.

आपल्या कर्तुत्वाने स्वतःचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या धांगवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका प्रतिभा पंखेवाले मॅडम(वय 45)  यांच्या अकस्मात निधनाने  भोर-वेल्हे तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी समाज,पालक  जणू सुन्न झाले आहे.

त्यांच्या निधनाची वार्ता सोशल मीडियाद्वारे कळताच  साऱ्यांची मने हृदय हेलावून गेली. अत्यंत दुःखद अशी घटना आहे.

 शिक्षण क्षेत्रात 24 वर्षांपासून अधिक काळ पंखेवाले मॅडम यांनी उत्कृष्ट काम केले. वेल्हे येथे मांगदरी शाळेत ,येवली(भोर) हरिष्चंद्री( भोर) तसेच सध्या धांगवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. कामात नीटनेटकेपणा ,सहकार्य ,व्यासंग पणा, मितभाषी ,हसत खेळत स्वभाव यामुळे त्या सर्वांच्या लक्षात राहिल्या होत्या. पंचायत समिती भोरचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.

आळंदे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे म्हणाल्या की,प्रतिभा पंखेवाले मॅडम यांचे काम  उत्कृष्ट होते. शालेय उपक्रमात त्या हिरीरीने सहभाग घेत होत्या. त्यांच्या  अकस्मात निधनाने अतीव दुःख झाले आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.



To Top