देशाच्या समृद्धीसाठी शिक्षकच महत्वपूर्ण:-सुदाम ओंबळे
उत्रौली केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र
कुमकर यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार.
भोर (प्रतिनिधी) :
शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण व मार्गदर्शन करण्याचे आवाहन भोर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांनी केले.
उत्रौली केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र कुमकर हे सेवानिवृत्त झाल्याने भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वतीने तथा , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
त्यावेळी अध्यक्षीय भाषणा प्रसंगी शिक्षक अध्यक्ष ओंबळे बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रुईकर उपस्थित होते
भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापुर्तीनिमित्त केंद्रप्रमुख रामचंद्र कुमकर यांचा सपत्नीक सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
गेली दोन दशकाहून अधिक काळ भोर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात शिक्षक ,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख म्हणून कुमकर यांनी उत्कृष्ट कामकाज केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यात व व समाज विकास साधण्याचं प्रभावी काम त्यांनी केले आहे.
यावेळी भोर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र ओंबळे, शिक्षक नेते मामा तनपुरे,भीमराव शिंदे,पंडित गोळे ,भोर तालुका शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष महेंद्र आप्पा सावंत ,कार्याध्यक्ष विकास खुटवड, लक्ष्मण शिळीमकर आदी व इतर मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
"न्यूज वार्ता"शी बोलताना केन्द्र प्रमुख रामचंद्र कुमकर म्हणाले की,माझ्या सर्व शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख बंधू भगिनींना..सप्रेम नमस्कार, पुणे जिल्ह्यातील, भोर तालुक्यात उत्रौली येथून केंद्रप्रमुख पदावरून आपल्या सर्वांचा निरोप घेताना मनात भावनांचा प्रचंड कल्लोळ उठला आहे.भोर तालुक्यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असतात.या ठिकाणी काम करताना आपण सर्वांनी जे अनमोल सहकार्य केले त्यातून उतराई होणे केवळ अशक्य. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझ्या परीने प्रयत्न करताना आपण सर्वांनी जी अनमोल सहकार्याची साथ दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपणा सर्वांचा निरोप घेताना मन भरून आले आहे,मात्र आपल्याशी जोडले गेलेले नाते सदैव जपण्याचा मानस आहे.

