राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत भोर गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांना प्रथम क्रमांक.

Maharashtra varta

 

राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धेत भोर  गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांना  प्रथम  क्रमांक.




पुणे (प्रतिनिधी)

राज्यस्तरीय  नवोपक्रम स्पर्धेत भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम यांनी प्रथम क्रमांक  मिळवत आपल्या  शैक्षणिक गुणवत्ता कार्याची मोहर उमटवली आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे  शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२०-२१ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात  आली होती.


समग्र शिक्षा नुसार SCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात आली होती.


 (सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवत त्यामध्ये  भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे  यांनी प्रथम क्रमांक  मिळविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भोर तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनीच्या वतीने कौतुक करत अभिनंदन केले आहे.)

To Top