चेलाडी फाटा येथील उड्डाण पुलाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल करा:-आदित्य बोरगे यांची मागणी.
नसरापूर (प्रतिनिधी):-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर (चेलाडी फाटा) येथील उड्डाण पुलाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल असे करावे, यासाठी 1मार्च 2021 रोजी युवासेना उपजिल्हा प्रमुख आदित्य बोरगे यांच्या नेतृत्वाखाली तमाम शिवभक्तांच्या वतीने नसरापूर ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ.रोहिणी ताई शेटे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख आदित्य बोरगे, अनिल शेटे,विजय कव्हे, शांताराम खाटपे,भानुदास थिटे, काका शेटे, प्रतिक कोंढाळकर, ओंकार चोरघे, अतुल चाळेकर हे उपस्थित होते.
सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी विनंती शिवभक्तांनी केली आहे.

