शिवराय प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक बांधिलकी जपत गड संवर्धन अभिनव उपक्रम.
वेल्हे ( प्रतिनिधी):-
हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती निमित्त प्रतिष्ठाण च्या माध्यमातून होणारे इतर कार्यक्रम रद्द करून किल्ले राजगड वर प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच कचरा संदर्भात निर्माण झालेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी किल्ल्यावर विविध ठिकाणी कचराकुंड्या बसवण्यात आल्या. स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व तसेच येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.तसेच सायंकाळचा सुमारास शिववंदना घेण्यात आली. व प्रतिष्ठाण मार्फत गड संवर्धनाची कामे करण्यात आली.
शिवराय प्रतिष्ठाणच्या सर्व सभासदांनी भान राखून मोलाचे योगदान दिले. मा. करण चोरघे , मा.विठ्ठल चोरघे,मा.अशोक सरपाले, मा. आप्पासाहेब भरम ,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अजय सरपाले( संस्थापक अध्यक्ष ) ,शुभम महाडिक ,स्वप्नील कांगडे,सागर भरम,तेजस शिंदे शुभम मोरे ,कुणाल पुकळे,प्रशांत शिंदे,मंदार मोरे, ओंकार पवार, प्रथमेश शेलार, प्रज्वल जाधव, तेजस पंडित,ओंकार मनोरे, समिर पांगुळ सौरभ खेमकर, इंद्रजित सावंत, सत्यजित सावंत,हर्षद शिळीमकर,विकास चोरघे,वैभव मुजुमले, रोहन भुरुक व इतर सभासद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

