स्कीलिंग इंडिया केंद्रात विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करावे:-स्कीलिंग इंडीयाचे महेश कदम

Maharashtra varta

 स्कीलिंग इंडिया केंद्रात विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करावे:-स्कीलिंग इंडीया राज्य प्रतिनिधी महेशराव कदम.


भोर (प्रतिनिधी)

स्किलिंग इंडिया तर्फे स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असुन कार्ड धारक उमेदवारांकरिता करिअर मार्गदर्शन, तांत्रिक  संगणक कोर्सेस, व्यवसायिक कोर्सेस, स्पर्धा परीक्षा, इंडस्ट्री अपडेट, स्वयंरोजगार, सरकारी व खाजगी नोकरी एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून दिले आहे. भोर तालुक्यातील तरुण -तरुणींनी आपली नावनोंदणी किकवी व भोर येथे करून घ्यावी, असे आवाहन स्कीलिंग इंडीया चे राज्य प्रतिनिधी महेशराव कदम यांनी केले.


किकवी ता. भोर येथे सर्व नागरिक ई- सेवा केंद्राचे उद्घाटन व स्किलिंग इंडिया च्या वतीने विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्डचे वितरण समारंभ संपन्न झाले. त्यावेळेस कदम बोलत होते.हे स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड प्रत्येक नवं-युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावी, तालुका ठिकाणी आधुनिक केंद्र स्थापन करण्यात येत आहे. हि सर्व केंद्र स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणुन ओळखली जातील व स्थानिक कारखाने, खाजगी कंपन्यांचे रोजगार एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये एकत्रित प्रदर्शित केले जातील. आजच्या पिढीस  व  नोकरी शोधकांसाठी आपले जॉब स्किल्स वाढवुन योग्य स्वयंरोजगार व  स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे हे स्किलिंग इंडियाचे उद्धिष्ठ आहे. 

पश्चिम महाराष्ट्र परिसरातील उमेदवारांकरिता भोर तालुक्यातील किकवी येथे आधुनिक केंद्र सुरु झाले आहे. प्रतिनिधी महादेव सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र कार्यरत राहील अशी माहिती महाराष्ट्र प्रमुख महेश कदम यांनी दिली. 

या कार्यक्रमासाठी राजगड पोलीस स्टेशन किकवीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे ,किकवी चे मा. सरपंच नवनाथ आबा भिलारे, किकवी चे नवनिर्वाचित सरपंच नवनाथ कदम,भोर तालुका प्रहार पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते, मा. सरपंच कैलास येवले, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सपकाळ, इंडस इन बँकेचे किरण लांडे, रणजित आकाशवेद, संपदा बँकेचे हरिनाम बुचडे, जितेंद्र लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य मोरवाडी चे संतोष मोरे, कीकवीचे मनोज निगडे ,ज्ञानेश्वर राऊत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा कोंढाळकर यांनी केले, तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले व आभार प्रियंका कोंढाळकर यांनी मानले.

(नुकत्याच सुरु झालेल्या केंद्रातून स्थानिक उमेदवारांनी आपली नोंदणी करून उत्तम प्रतिसाद दिला. पुजा कोंढाळकर, दिव्या पुजारी, राजेश सावंत, वैभव जाधव, नम्रता बोर्डे, संकेत पोळ अश्या अनेक उमेदवारांनी योग्य सपोर्ट मिळाल्याची पोहोच पावतीही दिली.  पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर परिसरातील शैक्षणिक संस्था व उमेदवारांनी आपली नोंदणी करण्याकरिता किकवी, भोर येथील अधिकृत केंद्रास संपर्क साधावा असे स्कीलिंग इंडिया चे राज्य प्रतिनिधी महेश  कदम यांनी सांगितले.)

To Top