पक्ष आदेशाचे पालन करत राजीनामा दिला:-श्रीधर किंद्रे.
कारी (प्रतिनिधी)
भोर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी काल (दि .5 ) रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हीप तथा पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानत, राजीनामा सुपूर्द केला.
भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार एका वर्षासाठी किंद्रे यांची सभापती पदासाठी वर्णी लागली होती. या कालावधीत सभापती पदास त्यांनी सुयोग्य न्याय देत चांगले काम केले.पक्ष बांधिलकी व पक्ष आदेश पाळला.
न्यूज वार्ता शी बोलताना, सभापती श्रीधर किंद्रे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे ना. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत माझे वडील स्व. रघुनाथ भाऊ किंद्रे यांनी तीस वर्ष तालुक्यामध्ये राजकीय प्रवास केला. तत्कालीन काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्व. रघुनाथ भाऊ किंद्रे यांना पाच ते सहा वेळा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्यास सांगितली. पक्ष आदेशाचे पालन करत स्व. भाऊंनी ही निवडणूक लढवत पक्ष नेतृत्वाचे तंतोतंत पालन करत एक आदर्श घालून दिला आहे.पक्षाने ज्यावेळेस किंद्रे परिवारावर जबाबदारी टाकली. ती जबाबदारी किंद्रे परिवारानं निष्ठेने व मोठ्या ताकदीने पूर्ण करून दाखवली. वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्ष संघटन,पक्ष विचार धारा तसेच पक्ष नेतृत्वाने, दिलेल्या आदेशाचे पालन करत चांगले काम तालुक्यांमध्ये केलेले आहे. मी गेली सहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व माझे वडील स्व. रघुनाथ भाऊ किंद्रे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. मागील पंचवार्षिक काळात कारी- उत्रौली गणात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असताना प्रवाहाच्या विरोधात मी पक्ष श्रेष्ठींचा आदेश पळत जबाबदारीने पंचायत समिती निवडणूक लढवली. व ती जिंकून दाखवली.

