रविंद्र कदम यांची महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार संघटना भोर आगार सचिवपदी बिनविरोध निवड
भोर (प्रतिनिधी):-
उत्रौली (ता.भोर) येथील रविंद्र भिकोबा कदम यांची महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार संघटना भोर आगारच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाली.रविंद्र कदम हे भैरवनाथ ग्रामविकास मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभेत रविंद्र कदम यांची बिनविरोध निवड झाली वाहक,चालक,या सर्वांना एकत्र घेवुन जास्तीतजास्त प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे कदम यांनी सांगितले.

