सायफन पद्धतीने बारमाही शेती करणारे बाबा गोळे.
भोर (प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील करंदी खे. बा. येथील आदर्श व प्रेरणादायी शेतकरी बाबा गोळे हे खडकाळ माळरानावर सायफन पद्धतीने बारमाही पाण्याच्या वापर शेतीसाठी करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेताना दिसत आहे.
करंदी खे. बा. येथील शेतकरी बाबा तुळशीराम गोळे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खडकाळ माळरानावर बारमाही सायफन पद्धतीने विहिरीचे पाणी घेऊन आदर्श शेती करून शेतकर्यांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलेला आहे.
शेती म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ती म्हणजे विहीर .नुसती विहीर असून चालणार नाही, तर त्याचबरोबर कृषी वीजपंप असणे आवश्यक आहे, अर्थात लाईट नसेल शेती करता येणार नाही,असे आपले म्हणणे असते.मात्र याला फाटा देत वीज पंपाविना शेती फुलवता येते.शेती करून दाखवता येते, असाच एक शेतकरी अवलिया म्हणजे बाबा गोळे ,यांनी आपल्या या 4 एकर वडिलोपार्जित असलेले खडकाळ,पडीक असलेल्या शेती मध्ये एक हजार फूट अंतरावर असलेली विहिरीच्या ठिकाणी लाईट अथवा लाईटचे पोल नाहीत. त्या ठिकाणी लाईटच अद्याप पोहोचलेली नाही ,ते खचले नाहीत,निराश, हताश न होता विहिरीच्या मधोमध पाईप टाकून जमिनीत गाडून ती पाईपलाईन 1 हजार फूट शेतात आणून बारमाही ते पिके घेत आहे.त्यामुळे 12 महिन्याचे येणारे लाईटबील त्यांना येत नाही, त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक बचत होऊन जास्तीत जास्त नफा शेतीतून त्यांना होत आहे.त्यातून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत लाखो रुपये उत्पन्न शेतीतून घेत आहे. सध्या त्यांच्या शेतात ज्वारी, कांदा, गहू आदी पिके तजेलदार दिसत आहे.पावसाळ्यात भात ,व टोमॅटो आदी पिके ते घेत आहे.त्यांच्या ही सायफन शेती पाहण्यासाठी शेतकरी बहुसंख्येने येऊन भेट देत आहेत.व त्यांचे कौतुक करताना दिसत आहे.

