ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न.
भोर( प्रतिनिधी):-
ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ,भोर तालुका कार्यकारणी आयोजित सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विक्रमदादा खुटवड (मा. उपसभापती पंचायत समिती.भोर) यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.व ग्राहक कल्याण फाऊंडेशन पदाधिकारी यांची नुकतीच सार्वत्रिक ग्रामपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणूकी मध्ये विजयी व सहभाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांचे "ग्राहक कल्याण फाऊंडेशन ,भोर तालुका" कार्यकारिणी यांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळेस ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह. भ. प .तुकाराम महाराज निंबाळकर,उत्तमराव झेंडे, अस्लम तांबोळी, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष काकडे ,संतोष मगर, पोपट साठे,ग्राहक कल्याण फाऊंडेशन भोर तालुका अध्यक्ष .सागर अरूण खुटवड, उपाध्यक्ष संतोष भडाळे, गुलाब मालुसरे ,सचिव.डाॕ संतोष तळेकर, कार्याध्यक्ष धनाजी पवार विशेष सल्लागार कृष्णा लक्ष्मण टापरे, दिलीप लिम्हण .बाबुराव रामचंद्र सोंडकर, दत्तात्रय गोळे ,राम पाचकाळे,मनोहर खुटवड , गोरख सुतार पोलीस पाटिल सागर पांगारकर ,समाधान पारठे ,देवेंद्र शिळीमकर व ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या मध्ये विजयी उमेदवारांचे सत्कार करण्यात आले. निलेश थिटे ,विकास खुटवड ,सागर पांगारकर नथुराम गायकवाड, सुवर्णा पालखे, महेश मालुसरे ,देवेंद्र शिळीमकर, नवनाथ खुटवड या सर्व उमेदवारांचे सत्कार करण्यात आले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .मनोहर खुटवड यांनी आभार मानले.

