अनंत दूध चे लोकाभिमुख व कौतुकास्पद काम:-अभिनव काळे.
अनंत दूधचा 23 सावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
भोर ( प्रतिनिधी):-
अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेडने कंपनीने 1 फेब्रुवारी 2021 रोजी 23 वर्ष पूर्ण केली. जवळजवळ दोन तपाच्या प्रवाहामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले. या संपूर्ण कालखंडात शेतकरी उत्पादक हा अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा केंद्रबिंदू ठरवत अनंत दूध चे काम लोकाभिमुख व कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर अभिनव काळे यांनी व्यक्त केले.
किकवी ता. भोर येथील अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चा 23 वा वर्धापन दिन संपन्न झाला.त्यावेळेस काळे बोलत होते ते पुढे म्हणाले की, 23 वर्षाच्या काळात अनेक गोष्टी बदलत जातात. परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कल्याण व हित अनंत दूध ने जबाबदारीने स्वीकारले असल्याची जाणीव झाली.
या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर अभिनव काळे ,बँक ऑफ महाराष्ट्र'च्या सिनियर मॅनेजर किरण अहिरराव, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी अनिकेत बैसरे,अनंत दूधचे संस्थापक दिलीप नाना थोपटे, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे संचालक जीवनराव तांबे, गोविंद थोपटे, भाऊ थोपटे,अनंत दूधचे एम. डी.नितीनशेठ थोपटे आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळेस अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एम.डी. नितीन शेठ थोपटे म्हणाले की, तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत अनंत दूध कंपनीने शेतकरी दूध उत्पादक यांच्या प्रती आपुलकी जिव्हाळा आणि स्नेह ,कायम टिकून ठेवण्याचे काम केले.आगामी काळात अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन योजना आणून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी काम करणार आहे.
यावेळेस अनंत दूध उत्पादक लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून यावेळेस देण्यात आले.पाचशे शेतकऱ्यांना तीन लाख रुपये प्रतिप्रमाणे 15 कोटी रुपयांचे कर्जमंजुरी पत्र शेतकऱ्यांच्या हातात देण्यात आले.
यावेळेस दूध उत्पादक प्रदीप कोळपे ,अरुण वरे यांनी मनोगते व्यक्त केली. कोविड काळात उत्कृष्ट काम करणार्या अनंत दुधच्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.तसेच अनंत दुधच्या आपत्कालीन वेळेत उत्कृष्ट काम केलेल्या कामगारांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत दुधचे प्रशासकीय अधिकारी गोविंद बापू थोपटे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक व सूत्रसंचालक प्रा. विठ्ठल पवार सर यांनी केले.

