मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना, भोर तालुक्यात सुरू.
भोर (प्रतिनिधी)
पशुपालकांच्या दारापर्यंत पशुरूग्णांना पशुवैद्यकिय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सन २०२०-२१ या राज्यस्तरीय योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यात(भोर,वेल्हा,मावळ,इंदापूर,बारामती व जुन्नर)ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामध्ये भोर तालुक्यात एक रूग्णवाहिका मंजुर करून देण्यात आली रूग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. भोर तालुक्यातील एकूण पशुधन संख्या ४३००० (मोठी जनावरे )आहेत.
या योजनेंअंर्तंगत आजारी जनावरांना उपचार,आवश्यक शस्त्रक्रिया,व्यंधत्व निवारण, कृत्रिम रेतन, लसीकरण,पशुंचे रक्तजल, नमुने इत्यादी अत्यावश्यक पशुवैैद्यकिय सेवा पुढील काही दिवसातच पशुपालक यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलआवाळे,डाॅ.एस.एस.गावकरे(मॅडम)- सहाय्यक आयुक्त पशुसंंवर्धन भोर, डाॅ.एस.आर.पाटील,डाॅ.पी.बी.येवतीकर व सर्व विभागीय डाॅक्टर व अधिकारी उपस्थीत होते.

