शाळांनी व्हिजन घेऊन आदर्श काम करा:-केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे.
आळंदे केंद्राची "इंगवली" येथे केन्द्र स्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
भोर (प्रतिनिधी)
प्रत्येक माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक विशिष्ट व्हिजन ठरलेले असते, त्याच धर्तीवर आळंदे केंद्राअंतर्गत प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या विकासाचे शिक्षण व्हिजन घेऊन ते तयार करून कृतिशील विविध शैक्षणिक गुणवत्ता पूर्ण उपक्रम राबवून माझी शाळा ,माझा प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण घडणारच असा आशावादी आधुनिक दृष्टीकोन ठेऊन कामाला सुरुवात करा असे आवाहन आळंदे केंद्राच्या प्रभारी केंद्रप्रमुख प्रभावती कदम-कोठावळे यांनी केले.
आळंदे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगवली ता. भोर येथे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून संपन्न झाली.त्यावेळेस कदम- कोठावळे मॅडम बोलत होत्या, पुढे त्या म्हणाल्या की,कुणीतरी येऊन बदल घडवील,याही पेक्षा स्वतः बदलाचा भाग व्हा,माझ्या समोर वर्गात बसलेला प्रत्येक विद्यार्थ्यांस त्या त्या इयतेत्तील अध्ययन स्तर ,क्षमता,कौशल्ये त्याने प्राप्त केलेल्या असाव्यात,याकडे अधिक जागरूकतेने लक्ष देणे गरजेचे असून त्या पद्धतीने अध्ययन अध्यापन करणे क्रमप्राप्त आहे.विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करा. स्वतःच्या नाविन्यपूर्ण छंदातून शाळेत सृजनशील उपक्रमातून विद्यार्थी विकासाचा वेध घ्या. असे मार्गदर्शन कदम -कोठावळे यांनी यावेळेस केले.
यावेळेस आळंदे केंद्राचे शिक्षण व्हिजन,शाळांतील भौतिक सुविधा,, गुणवत्ता वाढ,गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न आदी विषयावर सर्वानुमते चर्चा करण्यात आली.
यावेळेस आळंदे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

