बेलसर ग्रामपंचायतीत पती-पत्नी सदस्यपदी......
सासवड (प्रतिनिधी):-
नुकत्याच पार पडलेल्या बेलसर ता. पुरंदर येथील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत काही धक्कादायक निकाल हाती आले. निकालानंतर काहींनी विजयाचा गुलाल अंगावर घेतला तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले. ही निवडणूक तिरंगी लढतीने रंगली. बालसिद्धनाथ ग्रामविकास आघाडी , शिवशंभो ग्रामविकास आघाडी आणि बेलेश्वर शिवशंभो ग्रामविकास पॅनल या तीनही पॅनल मध्ये प्रमुख चार राजकीय पक्षांच्या गावपुढाऱ्यांनी आपआपली ताकद पणाला लावली. यामध्ये शिवशंभो ग्रामविकास आघाडीने निकालानंतर अपक्ष उमेदवाराना बरोबर घेत बहुमतासाठी आघाडी घेतली आहे. बालसिद्धनाथ ग्रामविकास आघाडीतून वार्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण पुरुष जागेवर कैलास पंढरीनाथ जगताप आणि इतर मागास प्रवर्ग स्त्री जागेसाठी पल्लवी कैलास जगताप हे दोघेही पती-पत्नी भरघोस मताने विजयी झाले.
बेलेश्वर , शिवशंभो ग्रामविकास पॅनल ला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. नुकताच विजयी उमेदवार सौं. पल्लवी जगताप, कैलास जगताप, संभाजी गरुड आणि सौ वैशाली गरुड यांचा आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरंगे, पंचायत समिती सदस्य सुनिता काकी कोलते, युवानेते गणेश जगताप , मामासाहेब गरुड , शिक्षकनेते संदीपआप्पा जगताप , हेमंत जगताप , अमोल जगताप , बशीर मुजावर , मिलिंद जगताप , सुनील गरुड, अर्जुन गरुड , प्रल्हाद गरुड , सचिन फंड हे उपस्थित होते. दरम्यान बेलसरचे अनुसूचित जाती साठी चे सरपंच पदाचे आरक्षण कायम राहिल्याने या जागेवर निवडून आलेले अर्जुन धेंडे हे सरपंच होतील .
परंतु एकाच वेळी, एकाच वॉर्ड मध्ये पती आणि पत्नी निवडून आल्याचा विषय बेलसर गावासह पुरंदर तालुक्यात चर्चेचा आणि कौतुकाचा झाला आहे.

