वाघापूरमध्ये भैरवनाथ प्रगती पँनेलचा विजय.

Maharashtra varta

 वाघापूरमध्ये भैरवनाथ प्रगती पँनेलचा विजय.

वाघापूरचा सर्वांगीण विकास करणार - बाजीराव कुंजीर.




गराडे दि.30 ( वार्ताहर ):-

राजकीयदृष्ट्या महत्वाच्या वाघापूर ( ता.पुरंदर ) ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेतृत्वाखाली भैरवनाथ प्रगती पॅनलच्या माध्यमातून सहा जागा जिंकत सत्ता संपादित केली.विरोधी भैरवनाथ प्रगती जनसेवा पँनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.

      मा. सरपंच  बाजीराव कुंजीर , नितीन  कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा गौरी कुंजीर ,पुरंदर तालुका युवक काँग्रेस माजी अध्यक्ष विकास इंदलकर, निवृत्त डी. वाय .एस. पी कृष्णाजी इंदलकर ,बापूसाहेब तु. कुंजीर ,बाळासाहेब म. कुंजीर ,अरुण वि. कुंजीर,  ज्ञानदेव आ. कुंजीर,गौतम  कुंजीर,सुनील  बा. कुंजीर,चांगदेव कुंजीर,कैलास ना. कुंजीर,अरुण सो. कुंजीर, कैलास कुंजीर,शहाजी कुंजीर,भाऊसाहेब कुंजीर,रमेश नि. कुंजीर याच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड यश मिळवीत वाघापुरची सत्ता मिळवली.

    भैरवनाथ प्रगती पँनेलचे विजयी  उमेदवार पुढीलप्रमाणे सौरभ शेखर कुंजीर, शंकर आण्णा कड, रेवती चांगदेव कुंजीर,दीपाली रमेश कुंजीर,कोमल किरण कुंजीर,ताई सुरेश कुंजीर.भैरवनाथ प्रगती जनसेवा पँनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे उज्वला अंकुश इंदलकर,सारिका हरिश्चंद्र कुंजीर व राजेंद्र नामदेव कांबळे .

मा. सरपंच बाजीराव कुंजीर, सौरभ कुंजीर  म्हणाले, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती, त्यात जनतेने जनशक्तीच्या बाजूने कौल दिला .येथून पुढे सर्वांना विश्वासात व बरोबर घेवून वाघापूरचा सर्वागीण विकास करणार आहे.

To Top