भोर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

Maharashtra varta

 भोर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.


भोर ( प्रतिनिधी) 

भोर तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या  73  ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणासह भविष्यात होणाऱ्या 83 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे असे एकूण 156 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे  आरक्षण  आज जाहीर करण्यात आले आहे.  

भोर पंचायत समितीच्या सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. यावेळेस भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील साहेब  यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.


आरक्षणाचे नाव व ग्रामपंचायतीचे नावे पुढीलप्रमाणे.


अनुसूचित जाती – खोपी, किकवी, सांगवी ( हि,मा. ) शिंद


अनुसूचित जाती स्त्री – बारे खु. कोर्ले, कुंबळे, खानापूर, केळवडे,


अनुसूचित जमाती – भुतोंडे, उत्रोली,


अनुसूचित जमाती स्त्री – आंबवडे, कुसगाव, पऱ्हर बु.


नागरिकांचा मागास प्रवर्ग – कांबरे खेबा. करंजगाव, रायरी, भोलावडे, कोळवडी, पांगरी, महुडे बु. सारोळे, कारी, शिरवली तर्फे भोर, वाठार हिंगे, वाढाणे गुनंद, टापरेवाडी, भांबवडी, वेनवडी, रांजे, वर्वे खु. करंजे, मळे, ससेवाडी


नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी स्त्री – वडतुंबी, शिवरे, पान्हवळ, मोरवाडी, दिवळे, नाझरे, कर्णावड, साळवडे, नांदगाव, पळसोशी, डेहेण, वरोडी डायमुख, कांजळे, गुहिणी, बारे बु. येवली. कुरुंगवडी, बालवडी, करंदी खु. हातवे बु. अंगसुळे


सर्वसाधारण स्त्री - वाठारहिमा. पाले, साळव, महुडे खु. कासूर्डी खेबा. हातवे खु. म्हाकोशी, वागजवाडी,  दुर्गाडी, सोनवडी, सांगवी बु. ब्राम्हणघर वेखो, वरोडी खु. पऱ्हर खु. जयतपाड, गूढे, पेंजळवाडी, निगडे, आंबाडे, राजघर, भांबवडे, नांद, कांबरे बु. कामथडी, भावखेल, नसरापूर, हातनोशी, हरीश्न्द्री, बसरापूर, केंजळ, रावडी, शिंळीब, जांभळी, निगुडघर, कापूरहोळ, पिसावरे, हर्णस, आंबेघर, वारवंड, संगमनेर, सांगवी तर्फे भोर, सांगवी वेखो, करंदी बु. वेळवंड, कुरुंजी, टीटेघर, नेरे, बाजारवाडी, तेलवडी, माळेगाव.


सर्वसाधारण – म्हसर बु. आळंदे, आळंदेवाडी, आशिपी, भोंगवली, चिखालावडे, चिखलगाव, देगाव, दापकेघर, धावडी, धांगवडी, गवडी गोरड म्हसवली गोकवडी, हिर्डोशी, इंगवली, जोगवडी, करंदी खेबा. कासुर्डी गुमा. खडकी, मोहरी बु. म्हाळवडी, म्हसर खु. नायगाव, न्हावी १५, न्हावी ३२२, नाटंबी, पारवडी, पांडे, पसुरे, पोम्बर्डी, सांगवी खु. सावरदरे. शिंदेवाडी, शिरगाव, तांबाड, उंबरे, वेळू, वर्वे बु. विरवाडी, वडगाव डाळ, वरोडी बु. मोहरी खु. नऱ्हे, कोंढरी, माझगाव, आपटी, शिरवली हिमा. राजापूर.








To Top