अयोध्येतील श्री.राम मंदिरासाठी पसुरे येथे निधी संकलन., अभियानास पसुरे ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद.
भोर (प्रतिनिधी):--
श्री. क्षेत्र अयोध्या या ठिकाणी होत असलेल्या प्रभू श्रीराम यांचे मंदिर जिर्णोद्धार करणे कामी भाटघर धरण जलाशय भागातील पसुरे येथे नुकतेच सामाजिक कार्यकर्ते "मनोजभाऊ धुमाळ" यांचे प्रयत्नातून, श्रीराम मंदिर जीर्णोद्धार मदत निधी संकलन अभियान आयोजित केले असता,पसुरे गावातील सर्व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ यांनी घरोघर जात या मदतीचे संकलन केले.स्वयंसेवकांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाची माहिती पत्रक देऊन जनजागृती केली.
या अभियान प्रसंगी -.राजेन्द्र धुमाळ-मा.उपसरपंच, विजय धुमाळ, . ज्ञानोबा सणस, रामचंद्र सणस,.अमोल धुमाळ,निखिल धुमाळ, करण धुमाळ, विशाल बांदल,दिगंबर धुमाळ, सुरेशनाना धुमाळ आदी ग्रामस्थ तसेच संघाचे पदाधिकारी-.सहस्त्रबुद्धे,.मांगडे,. माऊली बदक आशिष बाठे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.
अभियानास पसुरे ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भोर तालुका यांचे वतीने आभार मानण्यात आले.

