निगडे (कापूरहोळ) येथे सीएनजी पंप उद्यापासून होणार सुरु.

Maharashtra varta

 निगडे (कापूरहोळ) येथे सीएनजी पंप उद्यापासून होणार सुरु.




कापूरहोळ (प्रतिनिधी ):

गेल्या अनेक वर्षांपासून वाहनधारकांची मागणी  होती की, राष्ट्रीय महामार्ग भोर हद्दीत कापूरहोळ परिसरात   सीएनजी पंप व्हावा. हीच मागणी लक्षात घेऊन कंपनीच्या व शासनाच्या मदतीने निगडे (कापूरहोळ) ता. भोर येथे सीएनजी पंप उभारून कार्यन्वित करण्यात आल्याची माहिती "सह्याद्री सर्व्हिस स्टेशन,चे ,पोपटराव सुके ,बाबुराव सुके  व प्रवीण सुके ,मच्छिंद्र सुके,यांनी "न्यूज वार्ताशी" बोलताना सांगितले.

पुणे- सातारा हायवे, किकवी ता.-भोर जि-पुणे येथे  उद्या दि.1 मार्च  2021 रोजी सह्याद्री सर्व्हिस स्टेशन,चे निगडे (कापूरहोळ)"येथे सीएनजी पंप चालू होत असल्याची माहिती प्रशांत सुके यांनी दिली.

भोर तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच नसरापूर कापूरहोळ ,सारोळा,येथील नागरिक व हजारो वाहनधारकांना या "सीएनजी पंपाचा फायदा होणार आहे.आता या भागात सीएनजी सुरू झाल्याने वेळेची व पैशाची बचत  होणार असल्याचे वाहन धारकांचे  म्हणणे आहे.

(सीएनजी पम्प संपर्क क्रमांक:-

 9881447007)

--------------------------------------------------------------

To Top