शेतकरी हिताचे उपक्रम राबवा.:-मा. मंत्री शशिकांत शिंदे.
कापूरहोळ (प्रतिनिधी):-
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी टिकला तर देश टिकेल, ही भूमिका लक्षात घेऊन शेतकर्यांची गरज आणि शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम आपण राबवत आहात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा व त्यांना मदत कशी होईल .याबाबत अधिकाधिक उपक्रम आपण राबवावे यासाठी मी सर्वतोपरी मदत करेल ,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मा. जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
संगमनेर माळवाडी ता. भोर येथे बालाजी ॲग्रो मॉलच्या भव्य उद्घाटन समारंभ प्रसंगी शिंदे बोलत होते .या कार्यक्रमासाठी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र कोंडे ,राजगड उद्योग समूहाचे महेश दादा मरळ ,भोर तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेशदादा टापरे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन बांदल, उद्योजक तुषार शेठ सातव ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ राव निगडे, भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र साळुंखे,मा. सरपंच नितीन बांदल भोर, पंचायत समितीच्या मा. उपसभापती रोहिणी ताई बागल, भोर तालुका युवक अध्यक्ष नितिन दामगुडे, कापूरहोळ चे उपसरपंच पंकज बाबी गाडे, युवक काँग्रेस आयटी सेलचे अध्यक्ष अनिल सावंत, उद्योजक योगेश अहिरे, गणेश सावंत ,मा. सरपंच रवी नांदे ,सर्जेराव गोरड काळूराम मळेकर, माऊली पांगारकर, शिवाजी सासवडे ,किशोर बांदल, किरण बराटे संजय शेठ शिर्के, मुकेश भरेकर, शिवाजी कदम, उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश अण्णा बागल यांचा मार्गदर्शक म्हणून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी केले .तर उपस्थितांचे आभार बालाजी ऍग्रो मॉलचे लहू साळुंखे यांनी मानले, तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी एग्रो चे चेअरमन संतोष काका बागल यांनी केले तर स्वागत हनुमंत कारभळ यांनी केले.

