गौरवदादा जाधव यांना सामाजिक कार्यगौरव पुरस्कार.
पुणे (प्रतिनिधी):-
राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट व समस्त जाधव परिवार,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "आदर्श सामाजिक योगदान" दिलेबद्दल प्रहारचे राज्याचे युवा नेते व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांना "सामाजिक कार्यगौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कामासाठी तसेच रुग्णसेवेकरिता, हा पुरस्कार देण्यात येतो,हया वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी प्रहारचे राज्याचे युवा नेते व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव हे झाले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.मानाचे सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
19 फेब्रुवारी 2021 रोजी मोठ्या कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पुणे येथील जाधव रथाचे मानकरी व महाराष्ट्र राज्याचे शिवभक्त समीरदादा जाधव यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर प्रसंगी सातारा येथील क्षेत्र माहुलीचे निलेश जाधव , करणसिंह बांदल श्री.सौरभ अम्राळे व पुणे जिल्ह्यातील प्रहारचे सदस्य उपस्थित होते.
(यावेळेस पुरस्कारार्थी गौरव जाधव म्हणाले की,.माझ्या सर्व वडीलधारे बंधू भगिनीनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, तो नक्कीच मी भीष्म प्रतिज्ञा घेऊन पार पाडीन.)

