महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पुणे शहर) आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निंर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर.
पुणे शहर (प्रतिनिधी)
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आणि राज्यातील शिक्षक अनेक सुंदर संकल्पना वापरून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. काही उपक्रमशील शिक्षक सुंदर व्हिडिओ तयार करून संकल्पना सुलभ करण्यासाठी नवनवीन कल्पना वापरत आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पुणे शहर) यांचेकडून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला राज्यातील उपक्रमशील शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.पाठ्यांशावर आधारित फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी ही स्पर्धा होती.या स्पर्धेसाठी राज्यभरातून जवळपास अडीचशे व्हिडिओ आले होते. राज्यातील महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हापरिषद तसेच खाजगी शाळांमधील मराठी, हिंदी, इंग्लिश,उर्दू,गुजराथी माध्यमांचे शिक्षक सहभागी झाले होते.
अतिउत्तम तंत्रज्ञान व कल्पनाशक्ती, सर्जनशीलता वापरून शिक्षकांनी हे व्हिडिओ तयार केले होते.आज शिवजयंती चे औचित्य साधून या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यशस्वी स्पर्धक शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) सौ.ऋचा रत्नाकर गावस. HHS HIGH SCHOOL GHATKOPAR 400086. कुर्ला मुंबई ,प्रथम क्रमांक
२)सौ. श्वेता अमित कोंडे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे 30 पुणे , द्वितीय क्रमांक
३)अनामिका सुखदेवराव मांडवगडे
जि प शाळा ताथवडे,मुळशी,पुणे, तृतीय क्रमांक
तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रथम दहा
१)अंजली गंगाधर जावळे पुणे .म.न. पा. शा .क्र .६बी मराठी जेलवसाहत येरवडा पुणे.
२) सोनल खाबिया
Acharya Shree Vijay Vallabh primary school Haveli Pune
३)सौ.आशा अनिल खामकर प्रा.नाथ हरि पुरंदरे प्राथमिक विद्यालय शिवाजीनगर पुणे ५ हवेली पुणे
४)सौ. प्रतिभा महेश पाठक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक 1 , ३००, शुक्रवार पेठ पुणे महानगरपालिका पुणे शहर पुणे
५)अमोल भिमराव जाधव श्री सदगुरु बाबा महाराज सहस्रबद्धे विद्यामंदिर पुणे शहर पुणे
६)सौ.स्वाती भिमदेव जाधव.जि.प.प्राथ.शाळा, कर्हावागज.बारामती पुणे.
७)सौ.शुभांगी नितीन पुरी.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडदावणे. मुळशी.पुणे
८)श्री. आयुब कलाम शेख म.न.पा.शाळा क्र.१७४बी, कोंढवा बुद्रुक पुणे.हडपसर पुणे
९)सौ. ज्योती दीपक बेलवले.जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा शहापूर ठाणे
१०) महेजबीन शकील बागवान जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर श्रीरामपूर अहमदनगर
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सविता महाजन, मिलन गुरव - जंगम, सुनिता पिंगट, विजया महाडिक व स्मिता धारूरकर यांनी काम पाहिले.

