शिवजयंती निमित्त नसरापूर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

Maharashtra varta

 शिवजयंती निमित्त नसरापूर मध्ये   मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.




नसरापूर( प्रतिनिधी)

सूर्यवंशी हॉस्पिटल नसरापूर तर्फे शिवजयंती निमित्त  मोफत आरोग्य तपासणी शिबिरास  मोठा प्रतिसाद नागरिकांना देऊन हे शिबीर यशस्वी रित्या आम्ही पार पाडले असल्याची माहिती सूर्यवंशी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. विराज सुर्यवंशी यांनी बोलताना सांगितले.


 शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी शिवजयंती निमित्त सूर्यवंशी हॉस्पिटल नसरापूर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात हाडांची ठिसूळता, सांधेदुखी ,गुडघेदुखी कंबरदुखी, हिमोग्लोबिन चे प्रमाण मधुमेह तपासणी आधी विविध प्रकारच्या तपासणी या शिबिरात मोफत करण्यात आली.


या शिबिरासाठी तीन दिवसाकरिता  एकूण दीडशे नागरिकांना लाभ देण्याचे ठरले होते, मात्र एकाच दिवशी 200 नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला. या  शिबिरास मोठा प्रतिसाद  मिळाल्याचे सूर्यवंशी हॉस्पिटलने या वेळेस सांगितले.पुढील महिण्यात देखील असे मोफत शिबीर होणार असल्याचे यावेळेस सांगितले.



 यासाठी तज्ञ मार्गदर्शक डॉ.  देवेंद्र जाधव, डॉ. संदीप चोरडिया डॉ. विराज सूर्यवंशी ,डॉ. सुप्रिया चव्हाण उपस्थित होते.


 नसरापूर पंचक्रोशी परिसरातील नागरिकांनी  व माता भगिनींनी या मोफत आरोग्य शिबिराचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

To Top