मान्यता फाउंडेशन यांच्या वतीने काळुबाई माता मंदिर जीर्णोद्धार.

Maharashtra varta

 मान्यता फाउंडेशन यांच्या वतीने काळुबाई माता मंदिर जीर्णोद्धार.





 नसरापूर (प्रतिनिधी)

मान्यता फाउंडेशन पुणे, यांच्या योगदानातून जांभळी ता. भोर येथील काळुबाई माता मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मान्यता फाउंडेशनच्या वतीने काळुबाई मंदिराची डागडुजी, रंगकाम, वॉटर प्रूफिंग, हातपंप दुरुस्ती, लाईट फिटिंग, कपाट ,घड्याळ ड्रिलिंग तसेच मंदिराच्या परिसर स्वच्छ व सुशोभीकरण करण्यात आला.


 यावेळेस मान्यता फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक शेटे, उपाध्यक्ष तुषार पिलाने, सचिव दशरथ चोरगे, खजिनदार दिगंबर नाना जाधव आदी उपस्थित होते.


 या कार्यक्रमास साठी कातवडीचे  आदर्श सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पिलाने यांचे मोलाचे मार्गदर्शन मान्यता फाउंडेशनला लाभले.


 या कार्यक्रमासाठी भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती संपत आंबवले माजी सरपंच बबन जाधव, अविनाश आंबवले, हनुमंत जाधव, ज्ञानोबा जाधव, अण्णा तिखोळे, पांडुरंग जाधव, मोहन जाधव ,राजाराम जाधव ,अर्जुन जाधव ,भीमराव जाधव ,शंकर आंबवले, मारुती आंबवले, शिवानंद जाधव एकनाथ थांबवले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भगत एकनाथ बापू आंबवले यांचा सत्कार मान्यता फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आला. 


यावेळेस मान्यता फाउंडेशन चे उपाध्यक्ष तुषार पिलाने यांनी सांगितले की, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मान्यता फाउंडेशन पुणे जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम निस्वार्थी व निरपेक्षपणे राबवत आहे .लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, हे प्रमाणभूत मानून आम्ही आगामी काळात मोठी मोठी सामाजिक विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत आंबवले यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार यांनी केले.

To Top