भाजप पक्ष जनसामान्यांमध्ये अधिक लोकप्रिय :-गिरीश बापट.
भोर (प्रतिनिधी):-
भारतीय जनता पक्ष हा नेत्यांचा ,पुढाऱ्यांचा नसून तो सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.इथे घराणेशाही चालत नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेत कार्यकर्त्यांची एकजूट आणि त्या एकजुटीच्या माध्यमातून समाज व राष्ट्र घडवण्याचं अविरत काम होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जनसामान्यात अधिक लोकप्रिय आहे असे प्रतिपादन पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट यांनी केले.
निगडे ता. भोर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते, यावेळी निगडे येथील विनोद चौधरी ,महेश मालुसरे, रोहिदास मालुसरे ,सुनील मालुसरे, बाजीराव जाधव आदी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल शेवाळे, सुनील माने ,डोंगरी विकास परिषदेचे सदस्य विश्वासराव ननावरे ,भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे,कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे,सरचिटणीस दीपक तनपुरे,भोर तालुका भाजपा शहराचे अध्यक्ष सचिन मांडके,मा. अध्यक्ष राजाभाऊ गुरव,भोर भाजपा महिला अध्यक्षा दिपाली शेटे ,स्वाती गांधी अशोक पांगारे, अमर बुदगुडे, डॉ. नागेंद्र चौबे, भरत डिंबळे संतोष धावले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी तरुणांचे स्वागत करून बूथ संपर्क अभियान यशस्वी होण्यासाठी बुथ वर लक्ष ठेवा, असे आवाहन राहुल शेवाळे, बाळा भेगडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर आभार संघटक सरचिटणीस विजयकुमार वाकडे यांनी मानले.

