विश्वास ननावरे यांचे काम चांगले:-गणेश गोळे.
नसरापूर (प्रतिनिधी):-
मागील काळात डोंगरी विकास परिषदेच्या सदस्य पदाच्या माध्यमातून विश्वासराव ननावरे यांनी भोर तालुक्यात तसेच वेल्हे मुळशी, हवेली तालुक्यात चांगली विकास कामे केलेली आहेत. त्याचप्रमाणे आमच्या करंदी गावाच्या अंतर्गत रस्त्याला निधी देऊन गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारे काम त्यांच्या माध्यमातून सुटले ,असे प्रतिपादन भोंगवली गणाचे शिवसेनेचे अध्यक्ष गणेश गोळे यांनी केले.
कापूरहोळ ता. भोर येथे पुणे जिल्हा डोंगरी विकास परिषदेच्या सदस्यपदी विश्वासराव ननावरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच करंदी ग्रामपंचायतीच्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने अंतर्गत रस्त्यासाठी तीन लाख रुपयांचा निधी मिळावा, त्याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळेस भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन आप्पा कोंडे, भोर तालुका भाजपचे कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे ,गणेश गाडे, निलेश कोंडे आदी उपस्थित होते.

