तेलवडी येथे सोनाई दूध संकलन व पशुखाद्य केंद्र सुरू
कापूरहोळ :-प्रतिनिधी
सदगुरू उद्योगसमूह तेलवडी यांनी सोनाई दूध संकलन व पशुखाद्य केंद्र सुरू केले असून तेलवडी पंचक्रोशी परिसरातील शेतकरी बांधवांना याचा फायदा व लाभ होणार असल्याची माहिती ओंकार कडू व रोहन धावले यांनी दिली.
सोनाई दूध संकलन व पशुखाद्य केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते सम्पन्न झाले.या कार्यक्रमासाठी भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन आप्पा कोंडे, पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते विठ्ठल दादा आवाळे, अनंत दूध डेअरीचे प्रशासकीय अधिकारी गोविंद बापू थोपटे, दशरथ धावले,पोलीस पाटील हरिदास धावले,मा. सरपंच हरिभाऊ धावले,संतोष धावले, विजय तात्या धावले, कैलास धावले सरपंच दत्तात्रय धावले ,प्रमोद शिळीमकर ,चंद्रकांत धावले अजिंक्य धावले, प्रकाश धावले ,रामचंद्र धावले, दिलीप धावले ,पोपट धावले,सलीम पटेल अक्षय मस्के, नवनाथ काळे, शेखर चव्हाण ,अक्षय दगडे रघुनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

