शिवजयंती निमित्त नसरापूर मध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
नसरापूर( प्रतिनिधी)
सूर्यवंशी हॉस्पिटल नसरापूर तर्फे शिवजयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली असल्याची माहिती सूर्यवंशी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. विराज सुर्यवंशी यांनी "न्यूज वार्ता शी" बोलताना सांगितले.
शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी शिवजयंती निमित्त सूर्यवंशी हॉस्पिटल नसरापूर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. या शिबिरात हाडांची ठिसूळता, सांधेदुखी ,गुडघेदुखी कंबरदुखी, हिमोग्लोबिन चे प्रमाण मधुमेह तपासणी आधी विविध प्रकारच्या तपासणी या शिबिरात मोफत होणार आहेत.
यासाठी तज्ञ मार्गदर्शक डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. संदीप चोरडिया डॉ. विराज सूर्यवंशी असणार आहेत.
तरी नसरापूर पंचक्रोशी परिसरातील नागरिकांनी व माता भगिनींनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सूर्यवंशी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

