पुणे जिल्हा डोंगरी विकास समिती सदस्यपदी विश्वास ननावरे यांची फेरनिवड.
भोर (प्रतिनिधी):-
पुणे जिल्हा डोंगरी विकास समितीच्या सदस्यपदी आळंदेवाडी ता. भोर येथील विश्वास ननावरे यांची फेरनिवड करण्यात आली.
श्री.ननावरे गेली अनेक वर्षे समाज व राजकारणात सक्रिय आहेत. मागील काळात डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून भोर तालुक्यात उत्कृष्ट काम करून योगदान दिले आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ते नेहमी पुढे असतात. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हे पद मिळाल्याचे मानले जाते.
(मागील काळात डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी आणून विकास कामे करून दाखवली आगामी काळात देखील गावांची गरज व निकड लक्षात घेऊन अधिक विकासकामे प्रभावीपणे करणार असल्याचे ननावरे यांनी बोलताना सांगितले.)

