वेल्हा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडणूक बिनविरोध,अध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी राजेंद्र रणखांबे यांची निवड.
वेल्हे( प्रतिनिधी)
पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न वेल्हा पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. २८ जानेवारी २०२१ ते २७ जानेवारी २०२३ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जाहीर केले, यासाठी राहुल शिंदे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे:- अध्यक्ष राजेंद्र रणखांबे, उपाध्यक्ष: रोहित नलावडे सचिव:रोहिदास शेंडकर, जिल्हा प्रतिनिधी दत्ताजी नलावडे तर कार्यकारिणी सदस्यपदी मनोज कुंभार,विश्वासराव दामगुडे, संतोष दसवडकर,प्रशांत श्रीमंदीलकर,आकाश कांबळे,संतोष म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली. नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी अभिनंदन केले.
वेल्हे पञकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. करण्यात आले.वेल्हे तालुका पञकार संघाच्या सर्व नवीन पदाधिकारी यांचे पुणे जिल्हा पञकार संघाच्या वतीने मनपुर्वक अभिनंदन जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी केले.

