यात्रा उत्सवाचं निमित्ताने करंदी ग्रामस्थांनी केले, रक्तदान.

Maharashtra varta

 यात्रा उत्सवाचं निमित्ताने करंदी ग्रामस्थांनी केले, रक्तदान.


भोर तालुक्यातील आदर्श व प्रेरणादायी उपक्रम.




भोर (प्रतिनिधी)

मी समाजाचा, समाज माझ्यासाठी ही भावना प्रत्येकाने उराशी बाळगली पाहिजे. "माझी माती, माझी माणसं" हा विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवल्यास सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणादायी संदेश व प्रेरणादायी विचार मिळू शकतो. याचेच उदाहरण म्हणजे जननी माता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने करंदी बुद्रुक ग्रामस्थांनी रक्तदान  शिबिराचे आयोजन करून आपल्या गावाला व तालुक्याला एक प्रेरणादायी आदर्श उभा केलेला आहे, असे गौरवउदगार वाढाणे विविध विकास सोसायटीचे चेअरमन वसंतआबा वरखडे यांनी काढले.


करंदी (बु) ता. भोर येथे जननी माता यात्रोत्सव कोव्हीड 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा सामाजिक संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अगदी साध्या पद्धतीने साजरा केला. आपण समाजाचा देणे लागतो, ही उदात्त भावना ठेवत  सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जननी माता आणि मारुती देव मंदिर ट्रस्ट,यात्रा कमिटीच्या वतीने आदर्श शिक्षक कै.विकास गणपत सावंत यांच्या स्मरणार्थ भारती विद्यापीठ रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने दि.29 डिसेंम्बर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शेकडो जणांनी रक्तदान करत सामाजिक उपक्रमात सहभागी नोंदवला.



विधायक उपक्रमासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी महिलांनी सहभाग नोंदवला. गावचे ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी मधील सदस्य ग्रामपंचायत करंदी बुद्रुक चे उपसरपंच शिवाजी वाघ,आय टी सेल अध्यक्ष भोर तालुका अनिल सावंत,शिवसेना विभाग प्रमुख गणेश वरखडे,आदींनी रक्तदान केले.

यावेळेस  ग्रामपंचायत करंदी बुद्रुक सरपंच संतोष भावेकर,संदिप सावंत,वाढाणे विविध विकास सोसायटीचे चेअरमन वसंत आबा वरखडे, यात्रा कमिटी चे अध्यक्ष- विलास भडाळे,तंटामुक्ती अध्यक्ष- नामदेव सावंत, पोस्टमास्तर- दिनकर बोडके,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस- वसंत वऱ्हे,आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

रक्तदान शिबिराला मदत करणारे व सहयोग देणारे आरोग्य कर्मचारी व भारती हॉस्पिटल चे  डॉक्टर व नर्स व कर्मचारी यांचे आभार ग्रामस्थांनी मानले.

To Top