वाहनाच्या धडकेने वेल्ह्यातील साखरे केंद्रप्रमुख ठार.

Maharashtra varta

 वाहनाच्या धडकेने वेल्ह्यातील साखरे केंद्रप्रमुख ठार






वेल्हे :-( प्रतिनिधी)


 वेल्हे येथील प्रशासकीय कार्यालयातील मिटिंग आटोपून   घरी जात असताना पुणे - सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात वेल्हातील पानशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख तुकाराम साखरे जागीच ठार झाले. 



तुकाराम भगवान साखरे( वय ५५) ( रा. चिखली पुणे ) असे अपघातात ठार झालेल्या केंद्रप्रमुखाचे नाव आहे .ही घटना  6 जानेवारी 2020 रोजी रोजी सायं. सहाच्या सुमारास पुणे  - सातारा महामार्गावरील शिवरे ( ता . भोर ) येथील नीलकमल हॉटेलच्या समोर घडली. या घटनेमुळे शिक्षकामधून हळहळ व्यक्त होत होत आहे.


वेल्हा येथील शासकीय बैठक संपल्यानंतर साखरे हे  दुचाकीवरून एमएच १४ डीके. ८०३० त्यांच्या चिखली येथील घरी जाण्यासाठी सातारा पुणे बाजूकडून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडक बसली. स्थानिक तरुणांनी रुग्णवाहीका कळविले होते. मात्र रुग्णवाहिका वेळेवर पोहचू शकली नाही. यावेळी महामार्गावरून प्रवास करणारे डॉ. प्रशांत फरांदे व त्यांची पत्नी यांनी  जखमी झालेल्या केंद्रप्रमुख साखरे यांना स्वतःच्या चारचाकी वाहनामध्ये बसवून नसरापूर येथील सिद्धिविनायक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारा पूर्वीचे साखरे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 


  पुढील तपास पोलिस हवालदार सतीश चव्हाण करीत आहे.

To Top