वारकरी संप्रदाय क्षेत्रात ह. भ. प. राहुल महाराज पारठे यांचं उत्कृष्ट काम:-आमदार संग्राम थोपटे.
भोर (प्रतिनिधी)
वारकरी संप्रदाय क्षेत्रात ह. भ. प. राहुल महाराज पारठे यांचे योगदान आहे. गेली अनेक वर्ष किर्तन ,प्रवचनाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यात चांगलं काम उभे केले आहे. वारकरी शिक्षण संस्थेतून आदर्श सुसंस्कृत विद्यार्थी घडवा, असे आवाहन भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
ह.भ.प. राहुल महाराज पारठे यांचे अध्यत्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था, भोर (आपटी) येथील शाखेचे उद्घाटन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आमदार संग्राम थोपटे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी ह.भ.प .आर. के रांजणे (अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदाय) ह.भ.प.नामदेव महाराज किंद्रे,युवा नेते अनिल सावले, हनुमंत चव्हाण,लक्ष्मण पारठे, राजेंद्र शेटे, गितांजलीताई शेटे-(अध्यक्ष भोर तालुका महिला काँग्रेस), कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ बहुसंख्येन उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाराज भगत यांनी केले.