शिंदेवाडी ग्रामपंचायत श्री .वाघजाई माता परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात.

Maharashtra varta

 शिंदेवाडी ग्रामपंचायत श्री .वाघजाई माता परिवर्तन पॅनेलच्या  ताब्यात.


पुणे (प्रतिनिधी):-

भोर तालुक्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या शिंदेवाडी ता. भोर ग्रामपंचायत निवडणूक श्री. वाघजाई माता परिवर्तन पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले असून, श्री. वाघजाई माता परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात ग्रामपंचायत आली आहे.वीस वर्षांनंतर ही सत्ता ताब्यात आली आहे.

शिंदेवाडी ग्रामपंचायत एकूण नऊ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे.यामध्ये श्री. वाघजाई माता परिवर्तन पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले असून, माऊली पाणलोट पॅनलेचे दोन उमेदवार हे निवडून आले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून दिलेला आहे .

वाघजाई माता परिवर्तन पॅनेल च्या उमेदवारांमध्ये प्रवीण रोहिदास शिंदे, रोहिणी मारुती गोगावले, रेखा रामचंद्र गोसावी ,अरविंद पंढरीनाथ शिंदे ,अभिजीत दत्तात्रय शिंदे ,वैशाली पांडुरंग चौधरी हे उमेदवार निवडून आले आहेत.

तर माऊली पाणलोट पॅनेलचे दोन उमेदवार निवडून आले असून ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे ,शारदा ज्ञानेश्वर शिंदे हे  निवडणूक आले असून शितल जगताप या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.





श्री वाघजाई माता परिवर्तन पॅनलचे पॅनेलप्रमुख सदाशिव शिंदे लक्ष्मण आप्पा शिंदे, सोमनाथ माने दत्तात्रय शिंदे हे होते.

श्री वाघजाई माता परिवर्तन पॅनेलला लक्ष्मण शिंदे, सोमनाथ सोमाणी, सर्जेराव शिंदे ,सदाशिव शिंदे, दशरथ शिंदे, बबन गोसावी, विश्वनाथ शिंदे, पंढरीनाथ शिंदे ,विठ्ठल चौधरी, ज्ञानेश्‍वर गोगावले, नाथा शिंदे, हनुमंत शिंदे ,अजित शिंदे ,अविनाश शिंदे ,पांडुरंग गोगावले ,योगेश शिंदे ,अक्षय शिंदे, दत्तात्रय गोसावी ,गणेश शिंदे ,बाजीराव शिंदे आदींनी मदत केली.


(शिंदेवाडी गावचा सर्वांगीण विकास करणार असून प्रथम विकास कामे करणार, त्यानंतर सांगणार अशा पध्दतीने आम्ही काम करणार असल्याचे श्री .वाघजाई माता परिवर्तन पॅनेल प्रमुख "लक्ष्मण कृष्णा शिंदे" यांनी बोलताना सांगितले)

To Top