राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत जि.प.शाळा केंजळ शाळेचे सुयश.

Maharashtra varta

 काम करण्याची इच्छा आणि कौशल्याने व्यक्ती अव्वल बनते:-

गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे. 

राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत जि.प.शाळा केंजळ शाळेचे सुयश



भोर (प्रतिनिधी)

'काम करण्याची इच्छा आणि कौशल्य असेल तर माणूस कोणत्याही क्षेत्रात अव्वल ठरु शकतो', असे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात अव्वल  ठरलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळला मिळत असलेले यश हे त्याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी केले.


राज्यस्तरीय गीत-गायन स्पर्धा (ऑनलाईन) प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणीयांचेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ ता.भोर जि.पुणे या शाळेतील गीतमंचाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तेव्हा गटशिक्षणाधिकारी सोनवणे बोलत होत्या.

परभणी जिल्हा- शिक्षणाधिकारी डाॅ.सुचिता पाटेकर मॅडम यांनी या स्पर्धेचे निकाल जाहीर केले. 18 जिल्ह्यातील सुमारे  272 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. शाळेतील गीतमंचाने या स्पर्धेत लोकगीत प्रकार सादर करून अतिशय उल्लेखनीय आणि अभिनंदनीय कामगिरी केली. 

भोर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम यांच्या हस्ते गीतमंचातील या गुणी बालकलाकारांचा भेटवस्तू व खाऊ वाटप करून सत्कार केला गेला . गटशिक्षणाधिकारी सोनवणे  यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आणि अशाच यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पालक , ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांकडून या यशाबद्दल  मुलांचे कौतुक होत आहे.

(विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व मा. सभापती सुनीता ताई बाठे  यांनी विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.)

To Top