नसरापुर येथे 34 रुपये प्रति किलो दराने साखर विक्री सुरू.
संजीवनी पॅकर्स अँड फूडर्स प्रा.लिमिटेड ,नसरापूर.
नसरापूर( प्रतिनिधी):-
संजीवनी पॅकर्स अँड फूडर्स प्रा.लिमिटेड ,नसरापूर ता. भोर येथे आऊटलेट मध्ये साखर विक्री सुरू असल्याची माहिती संजीवनी पॅकर्स अँड फूडर्सचे संचालक व इंजिनिअर प्रदीप उत्तम बोरगे यांनी दिली.
नसरापूर ता. भोर येथे साक्षी मंगल केंद्र आणि बारदाणा डेपो.लगत असलेलेसंजीवनी पॅकर्स अँड फूडर्सच्या केंद्रात आउटलेट 34 रुपये दराने साखर विक्री सुरू आहे.
कमीत कमी दरात साखर मिळत असल्याने नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
(भोर आणि वेल्हा तालुक्यातील नागरिक या ठिकाणाहून साखर खरेदी करत आहे. या ठिकाणी 1 ,2,5 किलो साखर पॅकिंग करून दिली जात आहे).

