माळेगावातील राऊत पिता-पुत्रांनी फुलवली, बटाट्याची शेती
70 दिवसांत घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न.
नसरापूर( प्रतिनिधी)
माळेगाव ता. भोर येथील प्रगतशील शेतकरी असलेले पिता- पुत्र बापू राऊत व सागर राऊत या पिता पुत्रांनी आपल्या शेतात एकरी 15 टन बटाटा उत्पादन 70 दिवसांत घेतले.पहिल्यांदाच 2 एकरांत बटाट्याची लागवड केली होती.एकरी 14 ते 15 टन बटाटा काढला .पुकराज जातीचे बटाट्याचे वाण आहे. आदर्श शेतीची संकल्पना त्यांनी सत्यात उतरवून दाखवली आहे.कमीत कमी खर्च,व जास्तीत जास्त उत्पन्न घेतले आहे.
आपल्या शेतात आणि बाजारात काय विकते याचा विचार शेतकरी बांधवांनी करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा व बाजारपेठेतील बाबी याचा बारकाईने अभ्यास केल्यास शेती निश्चितच किफायतशीर फायद्याची होऊ शकते हे कृतीच्या माध्यमातून राऊत परिवाराने दाखवून दिलेले आहे.
आदर्श बटाट्याची शेती पाहण्यासाठी देगाव, नायगाव, करंदी, उंबरे, खडकी ,नसरापूर पंचक्रोशीतील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने बटाट्याची शेती पाहण्यासाठी भेट देत आहेत.
(राऊत परिवारास बटाटे शेती बाबत मार्गदर्शन शेती विकास ऍग्रो एजन्सीजचे प्रो. प्रा. व बळीराजा संघटनेचे नेते प्रमोद मोहिते ( नसरापूर)यांनी केले.)

