तेलवडी येथे कावळे मृतावस्थेत आढळले.
कापूरहोळ (प्रतिनिधी):-
मृत कावळे ऍक्शन प्लॅन फॉर्म भरून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यासाठी रोग अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडे तपासणी साठी मृत कावळा पाठवणार आहे,निष्कर्ष आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल,तेलवडी परिसरात असलेल्या पोल्ट्री धारकांना जैव सुरक्षा बाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचना भोरच्या पशुधन विकास अधिकारी भोरच्या डॉ. शुभांगी गावकरी यांनी दिल्या.
तेलवडी ता. भोर येथे काल दिनांक 17 रोजी सायंकाळी दोन कावळे मृतावस्थेत आढळले असल्याने तातडीने पशुधन अधिकारी यांनी तेलवडी येथे भेट देऊन मृत कावळे ताब्यात घेतले, गुंजवणी नदीपात्रालगत महादेव मंदिरा शेजारी हे मृत कावळे आढळले,त्यावेळेस गावकरी बोलत होत्या.
कासूर्डी गु.मा. येथील चिकन शॉपच्या मालकांनाही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या.यावेळेस सहाय्यक आयुक्त तालुका लघु चिकित्सलय भोर मधील परिचर सुधीर सोनवणे व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळेस सरपंच दत्तात्रय धावले,मा. सरपंच संतोष धावले,तंटामुक्ती अध्यक्ष भरत धावले,पोपट धावले ,चेतन धावले,राजाराम धावले,स्वप्नील धावले,शिक्षक विठ्ठल पवार सर व ग्रामस्थ उपस्थित होते.