दारूबंदी कृती समितीच्या भोर तालुका अध्यक्षपदी संतोष मोहिते यांची निवड.
भोर (प्रतिनिधी)
दारूबंदी कृती समितीच्या भोर तालुका अध्यक्षपदी संतोष मोहिते यांची निवड महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती भोर तालुका अध्यक्षपदी भोंगवली येथील संतोष ज्ञानोबा मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्या माध्यमातून समाजात जनजागृती करून संस्थेचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य हातून घडावे, गाव तेथे शाखा, शाखा तिथे कार्यकर्ता उभे करण्याचे काम आपल्या कार्याच्या माध्यमातून मोठे संघटन उभे रहावे, अशा प्रकारच्या महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे .
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अभिजित सकट यांनी त्यांना हे नियुक्तीपत्र दिले आहे.
यावेळेस प्रदेश अध्यक्ष मंगेश फडके कायदेशीर सल्लागार एडवोकेट अमोल सोनवणे, वासुधा ताई सरदार, रमेश शितोळे, संदीप लगड,महेश चाकणकर,गणेश मराठे उपस्थित होते.
.