ह. भ. प.नवनाथ महाराज लिमण यांचे कार्य उल्लेखनीय:- आमदार संग्राम थोपटे.

Maharashtra varta

 नवनाथ महाराज लिमण यांचे कार्य उल्लेखनीय:- आमदार  संग्राम थोपटे.


 वाजेघर (प्रतिनिधी):-

वांगणी ता. वेल्हे येथे कै.बाबासाहेब चोरघे यांच्या तेरावा विधीच्या श्रद्धांजली पर भाषणात बोलताना भोर ,वेल्हा मुळशीचे आमदार  संग्राम थोपटे म्हणाले की ,बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे व  माऊली अनाथाश्रम संस्थेचे अध्यक्ष नवनाथ महाराज लिमण यांनी अनाथ मुलांचा केलेल्या संभाळाचे कार्य उल्लेखनीय असून सर्व कार्यापेक्षा त्यांचे  कार्य श्रेष्ठ आणि उदात्त स्वरूपाचे आहे.त्यांच्या  या कार्याबद्दल आम्हाला नेहमीच आपुलकी आणि गौरव वाटतो, म्हणून बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेला आगामी काळात रोख स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात, मी निश्चितच मदत करणार आहे.


(बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अनाथांची माय ह. भ. प .नवनाथ महाराज लिमण म्हणाले की, भोर तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व नागरिकांचे  यांचे वेळोवेळी माझ्या संस्थेला व अनाथ मुलांना मदत होत असते ,त्यामध्ये भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांचेदेखील मला नेहमीच सहकार्य मिळत असते.)

To Top