जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी विक्रमदादा खुटवड

Maharashtra varta

 जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी विक्रमदादा  खुटवड.





कापूरहोळ:-(प्रतिनिधी) 

भोर, वेल्हा, मुळशी चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विक्रम  दादा खुटवड यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी जिल्ह्यात चुरस होती.  भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्यरत असलेले विक्रमदादा  खुटवड  यांचे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली.

या निवडीनंतर भोर  तालुक्यातून तसेच पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करणार असल्याचे खुटवड यांनी सांगितले.

To Top