किकवी येथे सर्व "नागरिक ई-सेवा केंद्र" सुरू.
भोर ( प्रतिनिधी) :-
किकवी ता. भोर येथे राष्ट्रीय महामार्गालगत नागरिकांची गरज व मागणी लक्षात घेऊन नागरिक ई सेवा केंद्र नुकतेच सुरू झाले आहे .या नागरिक ई सेवा केंद्रास नागरिक भेट देत असल्याचे दिसून येत आहे.
या नागरिक ई-सेवा केंद्रात ड्रायव्हिंग लायसन सर्विसेस, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास डोमेसाईल जातीचे प्रमाणपत्र ,मिळकतीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ,सर्व जातीचे दाखले जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ,त्याचबरोबर रोजगार मार्गदर्शन केंद्र ,एम्प्लॉयमेंट कार्ड तसेच पॅन कार्ड, गॅझेट, पासपोर्ट, विझा,उद्योग आधार ,शॉप ॲक्ट लायसन आदी विविध प्रकारची कामे या नागरिक सेवा केंद्रात केली जाणार असल्याची माहिती नागरिक सेवा केंद्राचे संचालक महादेव सुतार यांनी माहिती दिली.