पसुरे गावचे युवा नेते मनोजभाऊ धुमाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

Maharashtra varta

 पसुरे गावचे युवा नेते मनोजभाऊ धुमाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.



भोर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार.

पसुरे गावचे सुपुत्र तथा युवा नेतृत्व मा.मनोजभाऊ धुमाळ यांचे जन्मदिनाप्रित्यर्थ पसुरे गावातील ग्रामस्थ व युवकांच्या वतीने शाळा व महाविद्यालय यांना सॅनिटायझर स्टँड भेट व सॅनिटायझर तथा खाऊ वाटप करण्यात आले.आणि गावातील गरजूंसाठी पॅन कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता.

जवळपास ६०-७० नागरिकांना या मेळाव्याचा लाभ झाला आहे.सदर कार्यक्रम प्रसंगी-श्री.राजेंद्र धुमाळ-मा.सरपंच, श्री. रामचंद्र धुमाळ,श्री. दशरथ धुमाळ, श्री. विष्णू दिघे,श्री. भगवान धुमाळ, श्री. संभाजी धुमाळ, श्री. सुरेशनाना धुमाळ, श्री. शंकर धुमाळ, श्री. किसन कांबळे,श्री. दीपक कांबळे,श्री. मोहन कांबळे,कु.पंढरीनाथ गायकवाड इत्यादी ग्रामस्थ

तसेच महाविद्यालय शिक्षक श्री. नरळे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पसुरे चे मुख्याध्यापक श्री. संतोष कवितके, श्री.मंगेश चिखले व इतर शिक्षक व कर्मचारी,श्री. बाठे सर उपस्थित होते.

सदर उपक्रमाविषयी सर्व ग्रामस्थांनी मनोज धुमाळ यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून असे उपक्रम कायमस्वरूपी वरचेवर राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मनोज धुमाळ यांच्या कार्याचा गौरव केला.

To Top