व्हाट्सअप ग्रुप ची सेटिंग ॲडमिन ओन्ली करा:-पोलीस निरीक्षक विनायक वेताळ.

Maharashtra varta

 व्हाट्सअप ग्रुप ची सेटिंग ॲडमिन ओन्ली करा:-पोलीस निरीक्षक विनायक वेताळ.




नसरापूर( प्रतिनिधी):-

ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान व्हाट्सअप फेसबुक व इतर सामाजिक प्रसार माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.त्या ग्रुपवर  दोन गटात, जाती - जातीत, पक्षा पक्षात, पॅनल - पॅनेलमध्ये वाद होईल असे मेसेज पाठवले जात आहेत.त्यामुळे भोर तालुक्यातील तथा राजगड पोलीस स्टेशन नसरापूर च्या हद्दीतील  सर्व व्हाट्सअप ग्रुप एडमिन व सदस्यांना सुचित करण्यात येते की, कोणताही सदस्य दोन गटात, धर्मा - धर्मात, जाती - जातीत, पॅनल - पॅनलमध्ये, उमेदवारा - उमेदवारात वाद निर्माण होईल अशा पोस्ट, फोटो, मेसेज पोस्ट करणार नाही. अशी पोस्ट, फोटो, मेसेज केल्यास त्या ग्रुपचा ऍडमिन व संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती त्यास जबाबदार धरून त्यांच्यावर सायबर कायदे व भा.  द. वि. कायद्याप्रमाणे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व ग्रुप ॲडमिन यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रुप ची सेटिंग ॲडमिन ओन्ली अशी करावी. असे आवाहन राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

    

राजगड पो. स्टे. हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, भोर व हवेली तालुक्यातील बऱ्याच गावात  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२० - २०२१ चे अनुशंगाने दिनांक १५/०१/२०२१ रोजी मतदान होत  आहे. त्याबाबतची आदर्श आचारसंहिता मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने लागू झालेली आहे. सर्व ग्रुप ॲडमिन यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रुप ची सेटिंग ॲडमिन ओन्ली अशी करावी.

To Top