कापूरहोळ च्या नऊच्या नऊ जागा बिनविरोध.

Maharashtra varta

 कापूरहोळ च्या नऊच्या नऊ जागा बिनविरोध.

कापूरहोळ ग्रामस्थांनी दाखवला नवा आदर्श.



कापूरहोळ (प्रतिनिधी):-

कापूरहोळ येथील ग्रामस्थांनी एकीची वज्रमुठ करत एकमेकांतील  मतभेद ,मनभेद बाजूला ठेवून, एक विचाराने,नेक मनाने कापूरहोळ गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या नऊ जागा बिनविरोध निवड करुन भोर तालुक्यांमध्ये एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. सर्व सदस्यांची  बिनविरोध निवड झाल्याने भोर तालुक्यातुन व पुणे जिल्ह्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.


कापूरहोळ ता. भोर येथील बिनविरोध सदस्य मंगल संजय गाडे ,विनय सपकाळ, रोहित जगताप , गुलाब गाडे ,शोभा गाडे ,अजित शेख , पंकज  उर्फ बाबी गाडे, सविता गाडे,प्रज्ञा मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विशेष लीड घेणारे व सर्वांना एक करणारे नवनिर्वाचित सदस्य पंकज उर्फ बाबी गाडे यांनी "न्यूज वार्ता" शी बोलताना सांगितले की, गावात एकोप्याचे व सलोख्याचे वातावरण असेल, तर गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही, ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आगामी काळात कापूरहोळ हे गाव आदर्श विकासाचे रोल मॉडेल करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

To Top